विराटच्या ‘वीस हजार’ मनसबदारीवर विंडीजच्या ‘या’ खेळाडूने केले खास हिंदीतून कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने काल विंडीजचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने विंडीजसमोर २६९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीजला १२५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. यामध्ये कर्णधार विराट कोहलीनं ७२ धावांची खेळी केली तर, महेंद्रसिंग धोनीनं ५६ धावा केल्या. त्याचबरोबर या सामन्यात कर्णधार विराट कोहली याने एक नवीन विक्रम प्रस्थापित करत आंतराराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद २० हजार धावा करण्याचा विक्रम केला. त्यानंतर त्याचे विविध स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे. विराट कोहलीने या धावा पूर्ण करण्यासाठी ४१७ डाव खेळले आहेत.

यानंतर विंडीजचा माजी खेळाडू आणि महान फलंदाज ब्रायन लारा याने विराट कोहलीचे खास शैलीत अभिनंदन केले आहे. त्याने खास हिंदीत ट्विट करत विराट कोहलीचे कौतुक केले. या ट्विटमध्ये याने म्हटले आहे की, या क्लबमध्ये तुझे स्वागत आहे. हा विक्रम पूर्ण करण्यासाठी तू सचिन आणि माझ्यापॆक्षा ३६ डाव कमी खेळलास. त्याचबरोबर भारतीय संघाचे देखील विजयासाठी अभिनंदन. विराट कोहली याने विंडीजबरोबर काल खेळल्या गेलेल्या सामन्यात ३७ धावा करताच हा विक्रम केला.

त्याचबरोबर सर्वात जलद वीस हजार धावा करणारा तो जगातील पहिला खेळाडू झाला आहे. दरम्यान, याआधी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा,रिकी पॉन्टिंग, एबी डि विलियर्स, जॅक कॅलिस, राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून विराट कोहलीचे कौतुक करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

कोलेस्टरॉलने त्रस्त असल्यास करा ‘हे’ उपाय

वेदनेकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका,अन्यथा होऊ शकतात गंभीर समस्या