ICC World Cup 2019 : सेमीफायनल जिंकण्यात भारताचे पारडे जड ; जाणून घ्या आकडेवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता सेमीफायनल सामने होणार असून आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना होत आहे. सर्व क्रीडा रसिकांचे या सामन्याकडे लक्ष लागले असून या स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करण्याची भारताकडे मोठी संधी आहे.

या सामन्यात भारताचे पारडे जड असून भारत वर्ल्डकप सामन्यांत न्यूझीलंडवर भारी नसला तरी सेमीफायनलमध्ये भारत न्यूझीलंडच्या खूप पुढे आहे. मात्र या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवल्याने प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी चिंतेची बाब झाली आहे. मात्र या सामन्यातील दोन्ही दिवस पावसाने वाया गेले तरीदेखील भारतालाच या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो.

भारतीय संघाने सातव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून याआधीच्या सहा सेमीफायनलपैकी तीनमध्ये भारताने विजय मिळवला असून तीन सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आठव्यांदा या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. १९८३ आणि २०११ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला असून २००३ मध्ये भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना स्वीकारावा लागला होता. त्याच्या तुलनेत न्यूझीलंडने आठव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांना फक्त एकदा म्हणजेच २०१५ मध्ये मायदेशात खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश आला होता. त्यामुळे सध्याच्या आकडेवारी नुसार या सामन्यात भारताचे पारडे जड दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आठव्यांदा प्रवेश केला असून यातील त्यांनी सहा सामन्यांत विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, या सगळ्या आकडेवारीवरून भारत जरी आजच्या सामन्यात वरचढ दिसत असला तरी प्रत्यक्ष मैदानावर कोण कशी कामगिरी करतो यावरच फायनलचे तिकीट अवलंबून आहे.

‘पिवळे दात’ होतील पांढरेशुभ्र आणि मजबूत ! करा ‘हे’ घरगुती उपाय

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई