भारत न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना १-१ गुण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखेर पावसामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना रद्द करण्यात आला आहे, यामुळे दोन्ही संघाना एक एक गुण देण्यात आले आहेत. हा सामना सुरु होण्याआधीच पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि पाऊस झाल्याने सामना रद्द करण्यात आला. आता भारताचा पुढील सामना येत्या रविवारी पाकिस्तानबरोबर होणारे आहे, त्यातील भारताची कामगिरी महत्वपुर्ण असणार आहे.

यंदाच्या विश्वचषकावर पावसाचे सावट आहे. पावसामुळे अनेक सामन्यात बराच व्यत्यय आला आहे. आज देखील भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना होणार होता, परंतु त्यात पावसाचा व्यत्यय आला आणि सामना नाणेफेकावरच अडून राहिला. पावसामुळे अजून देखील नाणेफेक करण्यात आला नव्हता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेला हा सामना रद्द झाल्याने चाहत्याची निराशा झाली आहे.

आता लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान –
आता साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे ते पुढील सामन्यावर, जो भारत विरुद्ध पाकिस्तान असणार आहे. हा सामना रविवारी मँचेस्टर येथे होणार आहे, असे असले तरी याही सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हणले जात आहे. जर त्यादिवसी देखील पाऊस झाला तर हा ही सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द झाल्याने अखेर यात दोन्ही संघांना 1-1 गुण देऊन सामना निकाली काढण्यात आला. भारतासाठी हा सामना महत्वपुर्ण होता. परंतू सामना रद्द झाल्याने आता भारताच्या गुणांमध्ये फरक पडू शकतो.

आरोग्य विषयक वृत्त –

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे