ICC World Cup 2019 : वर्ल्डकपनंतर ‘हे’ दोघे जण टीम इंडियाला ‘अलविदा’ करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार खेळ केला असून भारताला या स्पर्धेचे प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाच्या दिशेनं आगेकूच केली आहे. आज भारतीय संघ साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्याचा प्रयत्न करेल.

या वर्ल्डकनंतर अनेक देशांच्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली आहे. त्यानंतर भारतीय फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा देखील रंगत आहेत. मात्र धोनीने यावर स्पष्टीकरण देताना आपण कधी निवृत्ती देणार याबद्दल माहिती देताना म्हटले कि, मी इतक्यात निवृत्ती घेणार नसून माझ्यापेक्षा इतरांना माझ्या निवृत्तीची जास्त घाई झालेली आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील दोन जण भारतीय संघाची या स्पर्धेनंतर साथ सोडणार आहेत. भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी या स्पर्धेनंतर भारतीय संघाबरोबरच करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे यापुढे ते भारतीय संघाबरोबर काम करणार नाहीत. याबाबत त्यांनी बीसीसीआयला माहिती दिली असून त्यांनी हा करार न वाढवण्याचे सांगितले आहे. यापुढे आपल्याला विश्रांतीची गरज असून आपण कोणतेही काम करणार नसल्याचे दोघांनीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवले आहे. दरम्यान, भारतीय संघाचा फिटनेस उंचावण्याचे श्रेय या दोघांना जात असून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तींची नेमणूक थोड्याच दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याविषयी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला कि, मैदानावरील माझी ऊर्जा आणि फिटनेस श्रेय त्यांनाच जाते.

आरोग्यविषयक वृत्त

अबब ! ‘नेलपेंट’ लावल्याने होऊ शकते ‘हे’ नुकसान

जाणून घ्या आरोग्यवर्धक खजुराचे ‘फायदे’

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

Loading...
You might also like