ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणतो ‘या’ संघावर ‘वीज’ पडो !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता रंगत वाढली असून सेमीफायनलमधील चार संघ जवळपास नक्की झाले असून चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये टक्कर असून पाकिस्तानची संधी फार कमी आहे. त्यांना आता चमत्कारच सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो. गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया १४ गुणांसह पहिल्या स्थानावर असून १३ गुणांसह भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे तर १२ गुणांसह इंग्लंड तिसऱ्या स्थानावर असून ११ गुणांसह न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे हे चार संघ सेमीफायनलमधील नक्की आहेत.

काल झालेल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानची उरली सुरली आशा देखील धुळीस मिळाली. त्यामुळे उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्धचा सामना पार पडल्यानंतर हि सगळी गणिते स्पष्ट होतील. मात्र त्याआधीच पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद युसूफ याने पाकिस्तानच्या सेमीफायनलमधील प्रवेशाबाबत बोलताना म्हटले कि, पाकिस्तानला आता एखादी नैसर्गिक आपत्तीच वाचवू शकते. तसेच पुढे बोलताना तो म्हणाला कि, पाकिस्तान स्पर्धेबाहेर आहे हे नक्की आहे, मात्र एखादी नैसर्गिक आपत्ती येवो किंवा वीज पडून प्रतिस्पर्धी खेळाडू अनफिट झाला तरच पाकिस्तान सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकेल.

या प्रकारे पाकिस्तानला मिळू शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात उद्या लॉर्ड्सवर सामना होणार आहे. ज्या सामन्यात त्यांचा पराभव झाल्यास किंवा विजयाची आकडेवारी चुकल्यास थेट वर्ल्डकपमधून बाहेर पडणार आहेत. जर उद्याच्या सामन्यात पाकिस्तान टॉस हारला आणि बांगलादेशने पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला तर तिथेच पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडणार. त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर सध्या एकच पर्याय आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला ४०० धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. त्यानंतर बांग्लादेशच्या संघाला ८४ धावांवर ऑलआऊट करावे लागेल त्याचबरोबर जर त्यांनी ३५० धावा केल्या तर बांगलादेशला ३८ धावांवर ऑलआऊट करावे लागेल. त्यामुळे हे गणित प्रत्यक्षात शक्य नाही. त्यामुळे पाकिस्तान जवळजवळ वर्ल्डकपमधून बाहेर पडलेलाच आहे.

आरोग्यविषयक बातम्या

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा