ICC World Cup 2019 : PM नरेंद्र मोदींचे ‘ट्विट’ ; पराभव ‘निराशाजनक’, पण …

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या सेमी फायनल लढतीत टीम इंडियाला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ट्विट’ करून भारताचा संघ नेटाने लढला ; पण पराभव निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाने शेवटपर्यंत झुंज देऊनही सामना जिंकता न आल्याने क्रीडाप्रेमी निराश झाले आहे. पंतप्रधान मोदींनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली असून निकाल निराशाजनक असला तरी भारताचा संघ नेटाने लढला, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

सामन्याच्या निकाल निराशाजनक आहे. परंतु शेवटपर्यंत झुंज देण्याची टीम इंडियाची लढाऊ वृत्ती वाखणन्याजोगी आहे. भारताने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये दमदार कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. जय आणि पराजय हा खेळाचा भाग आहे, असे ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading...
You might also like