वर्ल्ड कप २०१९ : ‘या’ फलंदाजाने मारला सर्वात लांब षटकार, चेंडूची शिलाई ‘उसवली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सोमवारी बांगलादेश आणि वेस्ट इंडिजमध्ये सामना झाला. या सामन्यात या सामन्यात बांगलादेशने विंडीजचा दारुण पराभव करत ७ विकेट्सनी विजय मिळवला. त्याचबरोबर या स्पर्धेतील त्याचा हा दुसरा विजय ठरला. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने विंडीजचा पराभव केल्याने सगळ्याच संघाना धक्का बसला आहे. या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने शानदार शतकी खेळी करत आपल्या संघाला ४१ व्या षटकातच विजय मिळवून दिला.

मात्र या सामन्यात एक घटना अशी घडली, ज्याने सर्व क्रिकेट रसिक चकित झाले. विंडीजचा फलंदाज निकोलस पुरण याने मारलेला षटकार पाहून क्रिकेट रसिक भारावून गेले. त्याचा हा षटकार इतका तगडा होता कि, त्यामुळे चेंडूची अक्षरशः शिलाई उसवली. त्याचबरोबर त्याने मारलेल्या या षटकाराने मैदानावर इमारतीच्या छतावरील कौले देखील फुटली. त्यावरूनच त्याने मारलेला हा षटकार किती तगडा होता याची प्रचिती येते. सामन्याच्या ३० व्या षटकात त्याने बांगलादेशचा गोलंदाज शाकिब अल हसन याच्या गोलंदाजीवर हा षटकार मारला. या सामन्यात त्याने ३० चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने २५ धाव केल्या.

दरम्यान, या सामन्यात झालेल्या पराभवाविषयी बोलताना विंडीजचा कर्णधार म्हणाला कि, या सामन्यात विरोधी संघाने सर्वच पातळीवर उत्तम खेळ केला. आम्ही ४० ते ५० धावा कमी केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये देखील सातत्य नव्हते, त्यामुळे आमचा पराभव झाला.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन