पाकच्या कॅप्टनची फाटली, म्हणाला ‘फक्त एकटा घरी जाणार नाही तर…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर संघावर टीका केली होती. १९९२ पासून सलग सात वेळा भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर माजी क्रिकेटपटूंनी मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे.

मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर आता सरफराज अहमद याने आपल्या संघाला कडक इशारा देत खेळ सुधारण्याचा आदेश दिला आहे. यावेळी त्याने खेळाडूंना सांगितले आहे कि,’वर्ल्ड कपमधल्या बाकीच्या मॅचमध्ये कामगिरी सुधारली नाही तर आणखी टीकेला सामोरं जायला तयार राहा. मी घरी जाईन असं कोणाला वाटत असेल तर तो मूर्ख आहे. जर काही वेडंवाकडं झालं तर फक्त मीच घरी जाणार नाही.’ एका खासगी संस्थेशी तो बोलत होता. पुढे बोलताना तो म्हणाला कि भूतकाळात काय घडले ते विसरून जा, आता स्पर्धेतील उरलेल्या सामन्यात आपल्याला खेळ उंचावून आपल्या देशवासीयांची मन उंचवायची आहे.

दरम्यान, स्पर्धेत आतापर्यंत पाकिस्तानने पाकिस्तानने ५ पैकी फक्त १ मॅच जिंकली आहे, तर ३ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आणि १ मॅच पावसामुळे रद्द झाली. पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तानच्या खात्यात ३ पॉईंट्स आहेत. त्यामुळे आता ते स्पर्धेत कसा खेळ करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पाकिस्तान आपला पुढील सामना २३ जून रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे.

सिनेजगत

#Video : १५ वर्षाच्या मुलाचा ‘संघर्ष’ सांगणाऱ्या ‘NOBELMEN’चा ट्रेलर ‘रिलीज’

अभिनेत्री कंगनासोबतच्या ‘किसिंग’ सीनला शाहिद कपूर म्हणाला ‘चिखल’, जाणून घ्या कारण

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

 “ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

आलेला ताप हा साधारण ताप समजू नका. डॉक्टरांना दाखवून त्या तापाचे लवकर निदान करा

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका

 फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू

 

You might also like