भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी टीमवर बंदीची मागणी, फॅन्सची न्यायालयात याचिका

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – विश्व कप क्रिकेट स्पर्धेत भारताकडून झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानात क्रिकेट टीम विषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. एका क्रिकेटप्रेमीने तर चक्क कोर्टात धाव घेत पाकिस्तान क्रिकेट संघावर बंदी घालून निवड समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

रविवारी भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला. विश्वकप क्रिकेट स्पर्धेत भारताने सलग ७ वेळा पाकिस्तानाचा पराभव केला आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यामुळे पाकिस्तान क्रिकेटप्रेमी आणि माजी क्रिकेट खेळाडु प्रचंड निराश झाले आहेत.

या निराशेतूनच एका क्रिकेटप्रेमीने चक्क गुजरांवाला न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात टीमवर बंदी घालावी व इजमाम उल हक अध्यक्ष असलेली निवड समिती बरखास्त करावी, अशी मागणी केली आहे. याचिका दाखल करुन घेताना न्यायालयाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) च्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठविली आहे.

दरम्यान, पीसीबी संचालक मंडळाची तातडीची बैठक आज बुधवारी लाहोर येथे होत आहे. त्यासाठी पीसीबीचे महाव्यवस्थापक वसीम खान हे परदेश दौरा सोडून लाहोरला परतले आहेत. या बैठकीत कोच आणि निवड समितीच्या बरोबरच अन्य काही सदस्यांना घरी पाठविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यात टीम मॅनेजर तलअतअली, गोलंदाजीचे प्रशिक्षक अजहर महमूद आणि संपूर्ण निवड समितीचा समावेश असू शकतो. त्याचबरोबर कोच मिकी अर्थर यांचा कालावधी न वाढविण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

या विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी अगदीच खराब राहिली आहे. आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये त्यांना केवळ १ विजय मिळविता आला असून ३ सामन्यात ते पराभूत झाले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला होता. ३ गुणासह ते तळाला ९ व्या क्रमांकावर आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर 

 ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू 

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका