PM मोदींकडून देखील ‘गब्बर’ शिखर धवनला दिला ‘धीर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : क्रिकेट विश्वकप स्पर्धेत भारत विजयाच्या दिशेने जोरदार वाटचाल करत असतानाच संघाचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेमधून बाहेर पडावे लागले. क्रिकेटमधील घडामोडींकडे सद्या पूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याची दखल घेत शिखर धवन याला ट्विटरच्या माध्यमातून धीर दिला आहे त्याचबरोबर पुनरागमनासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

शिखरने ९ जून रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. या सामन्यावेळी पॅट कमिन्सचा उसळता चेंडू खेळताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. या दुखापतीमधून धवन सावरण्यासाठी व्यवस्थापनाने काही काळ वाट पहिली. परंतु त्याच्या अंगठ्याच्या दुखापतीत आणि तब्येतीत समाधानकारक सुधारणा न झाल्याने शिखराला संघातून विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी बुधवारी बीसीसीआयने ऋषभ पंत याचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला.

नेमकं काय म्हणाले मोदी :
या घडामोडीनंतर नंतर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सर्वांशी संवाद साधला आणि चाहत्यांचे आभार देखील मानले. त्यानंतर सचिन तेंडुलकर सहित अनेकांनी ट्विटर अकाऊंटवर शिखरचं सांत्वन आणि कौतुक केलं आहे. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाउंट वरून धवनच कौतुक करत त्याला धीर दिला आहे त्यांनी म्हटले आहे, ” इंग्लंडमधल्या खेळपट्टीलाही तुझी उणीव नक्कीच भासत असेल. तू लवकरच पूर्णतः बरा होऊन पुनरागमन करुण संघाच्या विजयात हातभार लावशील याची मला खात्री आहे. ”

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा