ICC World Cup 2019 : वर्ल्डकपमध्ये ऋषभ पंतची ‘गोल्डन’ एन्ट्री, अंतिम ११ मध्ये संधी मिळणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास पाच सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ८९ धावांनी विजय मिळवत आपला तिसरा विजय साजरा केला.

मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणारा शिखर धवन उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला संधी देण्यात आली आहे. वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा होणार होती त्यावेळीच रिषभ पंत भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार होता. मात्र त्यावेळी त्याला १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आले नाही. मात्र त्याला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले. त्यानंतर आता शिखर धवन जखमी झाल्यानंतर रिषभ पंत याला संघात स्थान देण्यात आले आहे. दिनेश कार्तिक सारखा अनुभवी खेळाडू असल्याने त्याचा त्यावेळी विचार केला गेला नव्हता मात्र आता त्याने निवड समिताला आपल्याला संघात घेण्यासाठी मजबूर केले.

दरम्यान, रिषभ पंत याने भारतीय संघाकडून आतापर्यंत फक्त ५ एकदिवसीय सामने खेळले असून २३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये जरी त्याने स्वतःला सिद्ध केले असले तरी एकदिवसीय सामन्यात मात्र त्याला अजून तितकी संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला उर्वरित सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय संघाचे ४ सामने झाले असून दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड सारख्या तगड्या संघांबरोबर सामने झाले असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा