ICC World Cup 2019 : टीम इंडियाला इंग्लंडमध्येच सोडून ‘हिटमॅन’ रोहित शर्मा पत्नीसह मुंबईत दाखल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संघात फूट पडल्याची चर्चा सुरु असतानाच आता या चर्चेला बळ देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये वाद असल्याची बातमी जागरण या वृत्तसंस्थेने दिले होते. भारतीय संघाला इंग्लंडमध्ये सोडून रोहित शर्मा भारतात परतला आहे. रोहित शर्माचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच नाराज झाले. भारतीय चाहत्यात नाराजी पसरली असतानाच भारतीय संघातच फूट पडल्याचे वृत्त समोर आले. भारतीय संघात सर्वच काही आलबेल नसल्याची जाणीव सर्वांना झाली. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात अनेक निर्णयांवरुन मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एककल्ली कारभारावर आणि संघ निवडीवर काही खेळाडू नाराज होते. संघाला विश्वासात न घेता कोहली आणि शास्त्रींनी निर्णय घेतले. यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणावर आणि संघातील एकीवर परिणाम झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे. संघात विराट आणि रोहित असे दोन गट पडले आहेत. विराटच्या गटातील खेळाडूंना सर्वाधिक संधी दिली जाते, संघ निवड करताना पक्षपात केला जातो, असा दावा करताना टीम इंडियातील चौथ्या क्रमांकाचा दाखला देण्यात आला आहे. चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली. त्यासाठी अंबाती रायुडूला डावलण्यात आलं, असं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान संघाची निवड करताना मोठ्या प्रमाणात गटबाजी करण्यात आली. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहची कामगिरी उत्तम असल्यानं त्यांना वगळणं शक्य नव्हतं. मात्र ‘विराट कंपनी’ला संधी देण्यासाठी अनेकांना डावलण्यात आलं. सातत्यानं अपयशी ठरत असूनही संघ व्यवस्थापन के. एल. राहुलच्या पाठिशी उभं राहिल्याचं ‘जागरण’नं भारतीय संघातील एका खेळाडूच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच