ICC World Cup 2019 : ‘भारत-पाक’ सेमीफायनलमध्ये भिडण्याची दाट शक्यता, जाणून घ्या ‘हे’ गणित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आयसीसी विश्वचषक २०१९ आता रोमांचक फेरीत पोहोचला आहे. स्पर्धेतील भारताची पहिली पराभूतता अंतिम चारपर्यंत पोहोचणाऱ्या संघांचे गणित बदलू शकते. वर्ल्ड कपच्या ३८ व्या सामन्यात भारत हरल्याने आणि इंग्लंड जिंकल्याने पॉईंट टेबलचे खूप सारे समीकरण होताना दिसत आहे. एक गणित असेही होऊ शकते कि सेमी फायनल मध्ये भारत- पाकिस्तान आमने – सामने असणार आहेत.

वर्ल्ड कपमध्ये नॉकआउटसाठी ऑस्ट्रेलिया आधीच पात्र ठरला आहे. तर दुसऱ्या स्थानावर भारताला सेमी फायनल्स मध्ये जाण्यासाठी एका यशाची गरज आहे. जी आवश्यक आहे. भारताचे सामने श्रीलंका आणि बंगलादेशा सोबत होणार आहे. तिकडे पाकिस्तानला ४ नंबर तेव्हा मिळेल जेव्हा इंग्लंडची टीम न्यूजीलैंडला हरवेल. असे झाल्यास इंग्लंड १२ पॉईंटनी तिसऱ्या नंबरवर पोहचणार.

पाकिस्तानची टीम बांगलादेशला हरवत असेल तर न्यूजीलैंड आणि पाकिस्तानचे पॉईंट ११-११ बरोबर होणार आहेत. जर पाकिस्तानला सेमी फायनल्स मध्ये पोहचायचे असेल तर त्यांना कसून जिंकणे गरजेचे आहे. तेव्हाच त्यांचे मायनस मध्ये चालू असलेले रन रेट प्लस मध्ये पोहचू शकणार आणि न्यूजीलैंडचे रन रेट पार करू शकणार. जर पाकिस्तान हे करण्यात यशस्वी झाले तर न्यूजीलैंडला ११ अंक असूनही टॉप ४ मध्ये जागा मिळणार नाही आणि पाकिस्तानचे सेमीफायनल्स मध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

नोकरी शिक्षणानंतर आता स्थानिक निवडणुकांत मराठा आरक्षण ?