शिखर धवन ‘या’ सामन्यातून ‘कमबॅक’ करणार, कॅप्टन विराट कोहलीची माहिती

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला.
मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणारा शिखर धवन उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तीन आठवडे स्पर्धेतून आराम करणार आहे. मात्र न्यूझीलंडबरोबर होणाऱ्या सामन्यात संघाच्या चिंतेत भर पडली असताना आता कर्णधार कोहलीची चिंता कमी होणार आहे. काल न्यूझीलंडविरुद्धचा सामना झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कर्णधार विराट कोहली याने सलामीवीर शिखर धवन विषयी वक्तव्य केलं आहे. शिखर धवन कोणत्या सामन्यातून पुनरागमन करणार याची अपडेट त्याने दिले आहेत. तो दुखापतीतून सावरत असून १० ते १२ दिवसांत कमबॅक करेल असा विश्वास आहे. त्यामुळे भारतीय पाठीराखे आणि चाहत्यांसाठी चांगली खबर आहे.

याविषयी बोलताना म्हणाला कि, “सध्या त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आले आहे आणि पुढील काही दिवस ते तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकिस्ता करण्यात येईल. मला आशा आहे कि, तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळेल”. त्यामुळे त्याच्या दुखापतीविषयी गंभीर असण्याचे कारण नाही. शिखर धवनला पाकिस्तान (१६ जून), अफगाणिस्तान (२२जून) आणि वेस्ट इंडिज (२७ जून) या लढतींना मुकावे लागणार आहे. त्यानंतर शेवटच्या दोन साखळी सामन्यात तो खेळण्याची शक्यता कोहलीने वर्तवली आहे.

You might also like