ICC World Cup 2019 : बुमरानं सांगितलं ‘टीम इंडिया’च्या यशाचं ‘गुपित’, ‘या’ २ गोष्टींकडे देत नाही लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत शनिवारी भारतीय संघाने श्रीलंकेवर शानदार विजय मिळवत वर्ल्डकप स्पर्धेत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताचा सामना चौथ्या स्थानावरील न्यूझीलंडबरोबर होणार आहे. त्याचबरोबर या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद १०० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याने स्वतःच्या सफलतेचे गुपित देखील सांगितले आहे.

यावेळी बोलताना तो म्हणाला कि, मी टीका आणि कौतुक या दोन्ही गोष्टी गांभीर्याने घेत नाही. मी फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष देतो. योजना कशाप्रकारे अंमलात आणायच्या यावर माझे जास्त लक्ष असते आणि संघासाठी मी काय करू शकतो यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो. पुढे बोलताना तो म्हणाला कि, आम्हला आनंद आहे कि, आम्ही सर्व विकेट घेत आहोत आणि संघासाठी आमचे योगदान देत आहोत. भारतीय गोलंदाज सध्या उत्तम कामगिरी करत असून नियमित अंतराने ते विकेट घेत आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वांनीच चांगला खेळ केला असून हि स्पर्धा चांगली जात आहे. त्याचबरोबर फलंदाजीत देखील आम्ही चांगली कामगिरी करत आहोत.

Image result for team india win world cup 2019

यशस्वी होण्याचं गुपित –

भारतीय संघाच्या यशाच्या गुपितांबाबत बोलताना तो म्हणाला कि, भारतीय खेळाडूंमध्ये आव्हानाचा सामना करण्याची क्षमता आणि जबाबदारी घेण्याची देखील क्षमता आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. प्रत्येक जण जबाबदारी घेऊन खेळत आहे आणि हि चांगली गोष्ट आहे. तुमच्यावर जास्त जबाबदारी दिल्यानंतर तुम्ही त्या योजनेवर काम करून आणखी उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करता.

दरम्यान, भारतीय संघाने या स्पर्धेतील साखळी सामन्यांतील ९ पैकी ७ सामन्यात विजय मिळवला असून १ पराभव आणि एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघ जिंकावा यासाठी क्रीडा प्रेमी मोठ्या प्रमाणात प्रार्थना करत आहेत.

या पाच गोष्टींचा ‘आहारा’ त करा वापर, शरीर होईल निरोगी

पश्चिम उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी आता ‘रेल्वे आरोग्य कार्ड’

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार