ICC World Cup 2019 : उलटा झालेला ‘हा’ भारतीय संघाचा खेळाडू कोण, बीसीसीआय म्हणतं ‘पहचान कौन’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आज पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि न्यूझीलंड भिडणार आहेत. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफड मैदानावर हा सामना रंगणार असून यासाठी सोमवारी भारतीय संघाने जोरदार सराव केला. यानंतर बीसीसीआयने या सराव सत्राचे काही फोटो ट्विटरवर अपलोड केले. या फोटोंमध्ये भारतीय संघाचा एका खेळाडू उलटा झालेला दिसून येत आहे. हा फोटो ट्विट करत बीसीसीआयने विचारले कोण आहे हा खेळाडू ?

यानंतर अनेक फॅन्सनी यावर उत्तर देताना म्हटले कि, हा खेळाडू रिषभ पंत आहे. तर काहींनी मजेदार उत्तर देताना ‘द मॅट्रिक्स’ या हॉलिवूडच्या पिक्चरशी तुलना केली आहे. आणि म्हटले आहे कि, पंत गोळीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. तर एका ट्विटर युझरने पंतच्या या कृतीला योगाशी जोडत मजेदार उत्तर दिले आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. साखळी सामन्यांतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड भलेही आजपर्यंत वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये एकेकांसमोर आले नसले तरी विराट कोहली आणि केन विलियम्सन हे २००८ मध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकप मध्ये दोघेही समोर आले होते आणि या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. त्यामुळे या सामन्यात देखील भारतीय संघच जिंकणे असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे.

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

Loading...
You might also like