भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकात क्रिकेट आता ‘भगव्या’ रंगाच्या जर्सीत खेळणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ३० मे रोजी या स्पर्धेचा पहिला सामना खेळवला जाईल. मेन इन ब्लू अशी ओळख असलेला भारतीय संघ या विश्वचषकात वेगळ्याच रंगाच्या जर्सीत खेळताना दिसून येणार आहे. भारतीय संघ निळ्या रंगाच्या जर्सीबरोबरच भगव्या रंगाच्या जर्सीत देखील खेळताना दिसून येणार आहे. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे अशा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे. सध्या भारतीय संघ निळ्या रंगाच्या आणि भगव्या रंगछटा असलेली जर्सी वापरात आहे.

कधी वेगळ्या रंगाची जर्सी घालणार ?
भारतासह यजमान इंग्लंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघांची पारंपरिक जर्सीही निळ्या रंगाची आहे. त्यामुळे भारतीय संघ जेव्हा अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध खेळली तेव्हा ते भगव्या रंगातल्या जर्सीत दिसेल तर विरोधी संघ त्याच जर्सीत दिसेल.

या संघांनाही जर्सीचा रंग बदलावा लागणार
याचबरोबर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या तीन संघांची जर्सी हिरव्या रंगाची आहे. त्यामुळे ते देखील आपल्याला वेगळ्या जर्सीत खेळताना दिसतील.