ICC World Cup 2019 : टीम इंडिया विजयाच्या दृष्टीक्षेपात

मँचेस्टर : वृत्तसंस्था – भारताने दिलेल्या ३३७ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानवरील विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. पावसामुळे खेळात एकदा व्यत्यय येऊन खेळ पुन्हा सुरु झाला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, विजय शंकर यांच्या वेगवान माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाज गोंधळून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.

अष्टपैलू विजय शंकरने वर्ल्डकपमध्ये पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या इमाम उल हकल पायचीत केले आणि भारताला पहिले यश मिळाले. त्यानंतर फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहेलने बाबरला त्रिफळाचित केले. बाबर ४८ धावांवर बाद झाला. पाकिस्तानच्या फखर जमाला फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने बाद केले. फखर आणि इमाम हे महत्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर पाकिस्तानची संपूर्ण फलंदाजीच ढासळली आणि भारताचा विजय निश्चित झाला.

हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक केवळ शून्य धावांवर बाद झाला. त्याला यानंतर आलेल्या पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजला देखील विशेष खेळी करता आली नाही. विजय शंकरने सर्फराजला क्लीन बोल्ड केले. विजय शंकर, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी पाकिस्तान धावसंख्या १६६ धावांवर ६ बाद अशी झाली होती. पाकिस्तानला विजयासाठी ९० चेंडूत १७१ धावा करायच्या आहेत. हे आव्हान पार करणं पाकिस्तानसाठी अशक्य आहे.

तत्पूर्वी, पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केले. या निर्णयाचा फटका पाकिस्तानला बसला आहे. या निर्णयाबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजवर जोरदार टीका होत आहे. हिटमॅन रोहित शर्माने दमदार शतकी खेळी करत वनडे कारकिर्दीतील २४ वे शतक झळकावले. हिटमॅनने केवळ ११३ चेंडूत १४० धावांची जबरदस्त खेळी केली. रोहित शर्माची हीच खेळी भारताच्या विजयास कारणीभूत ठरताना दिसत आहे.

आरोग्य विषयक वृत्त-

शरीराचे ‘तो’ भाग दाबल्याने दूर होतात अनेक समस्या
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा
कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे