ICC World Cup 2019 : टीम इंडियाची आज खरी ‘कसोटी’

मँचेटर : वृत्तसंस्था – भारत आणि न्युझिलंड यांच्यातील काल खेळविण्यात आलेला उपात्य फेरीतील सामना पावसामुळे अर्धवट राहिला असून तो आज पुढे खेळविण्यात येणार आहे. आजही स्थानिक वेळेनुसार दुपारी २ (म्हणजे भारतात साधारण साडेसात) पाऊस येण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भारताने न्युझिलंडला कमी धावांमध्ये रोखले तरी जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तर भारताला ते अधिक अवघड जाणार आहे. याला कारण डकवर्थ लुईसचा नियम.

राऊंड रॉबिन फेरीमध्ये भारत आणि न्युझिलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. आता सेमी फायनलमध्येही पाऊस आडवा आला आहे. भारताने न्युझिलंडला ४६. १ षटकात २११ धावांवर रोखले आहे. आज पाऊस झाला नाही तर सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरु होईल. न्युझिलंड उरलेली षटके खेळेल. त्यानंतर भारताच्या फलंदाजीला सुरुवात होईल. यावेळी टीम इंडियाची खरी कसोटी लागणार आहे. डावाला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना डकवर्थ लुईस नियमानुसार आकड्यांची जुळवा जुळवी करावी लागेल.

सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान २५ षटके झाली पाहिजे असा नियम आहे. भारताचा डाव सुरु झाला काही षटकानंतर पाऊस आला तर भारताला २५ षटकात इतक्या धावा करण्याचे लक्ष्य दिले जाईल व जर ते लक्ष्य गाठण्यास भारताला अपयश आले तर तेथेच भारताचा खेळ समाप्त होईल.

डकवर्थ लुईस नियमानुसार अगोदर खेळलेल्या संघाने केलेल्या सर्वाधिक धावांची षटके गृहीत धरुन नंतर खेळणाऱ्या संघाला वेळेनुसार जितकी षटके खेळायला मिळेल त्यानुसार जास्तीत जास्त धावा झालेली षटके एकत्र करुन लक्ष्य दिले जाते. त्यामुळे कदाचित पाऊस आला तर भारताला २५ व त्यापेक्षा अधिक षटकात २०० धावांपर्यंतचे लक्ष्य सुद्धा मिळू शकते.

हे लक्षात घेऊन टीम इंडियाच्या फलदांजांना पहिल्या षटकापासून आपली धावगती डकवर्थ लुईस नियमानुसार न्युझिलंडपेक्षा अधिक राहील याचा विचार करुन खेळावे लागणार आहे. ओलसर खेळपट्टीवर असे मोठे लक्ष्य गाठण्याचे हे मोठे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. त्यात त्यांची खरी कसोटी लागणार आहे.

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय