ICC World Cup 2019 : भारताला मोठा धक्का, धवन पाठोपाठ भुवनेश्वरही वर्ल्ड कपला मुकणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे.

दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे.

कर्णधार विराट कोहली आणि त्याचे  शिलेदार या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणारा शिखर धवन उजव्या अंगठ्याला दुखापत  झाल्याने आगोदरच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

त्याच्यानंतर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या पायाचे स्नायू ताणले गेल्याने  तो दोन ते तीन सामन्यांमध्ये खेळू शकणार अशी माहिती मिळत असतानाच आता त्याची हि हि दुखापत गंभीर असून या स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बीसीसीआयकडून भुवनेश्वर कुमारच्या फिटनेसबद्दल काहीही अधिक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे भुवनेश्वरच्या दुखापतीचे नेमके स्वरुप काय, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.

मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने आता भुवनेश्वरच्या जागी एका गोलंदाजाला इंग्लंडमध्ये बोलावले आहे. नवदीप सैनी याला बीसीसीआयने इंग्लंडला बोलावल्याने तो भुवनेश्वरची जागा घेणार कि फक्त नेट्समध्ये गोलंदाजी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याआधी नवदीप सैनी हा भारतीय संघासाठी नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी निवड करण्यात आली  होती. मात्र आयपीएलमध्ये जखमी झाल्याने तो सुरुवातीपासून भारतीय संघाबरोबर जाऊ शकला नव्हता. नवदीप सैनी याच्या समावेशाविषयी बोलताना बीसीसीआयने म्हटले आहे कि,” सैनी हा एकमेव गोलंदाज आहे, जो भारतीय संघाबरोबर कायम राहणार आहे.

तो संघाबरोबर नेट्मध्ये सराव करणार आहे”, असे सांगितले होते. मात्र आता नवदीप भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात येणार का, हा प्रश्न चाहत्यांसोमर आहे. मात्र भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा मोहम्मद शमी याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅट्रिक घेत आपण या जागेसाठी तयार असल्याचे सांगताना भारतीय संघात आपण योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिल्याने सध्यातरी भारतीय संघाला चिंता करण्याची गरज नाही.

 

आरोग्यविषयक वृत्त – 

रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध

इंटरनेटचा अतिरेकी वापर करतो मेंदूच्या ‘या’ क्षमतांवर परिणाम

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’

दातांवरून जाणून घेता येऊ शकते , तुमचे आरोग्य किती चांगले