#Video : भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच पाहण्यासाठी ‘शौकीन’ विजय मल्ल्या ओव्हलच्या मैदानावर

वृत्‍तसंस्था – देशातील अनेक बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चालु असलेला क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी लंडन येथील ओव्हलच्या मैदानावर हजेरी लावली. यावरून कोटयावधी रूपयांचा गंडा घालणार्‍या विजय मल्ल्याचे अद्यापही शौक पूर्ण झालेले दिसत नाहीत.

एएनआय वृत्‍तसंस्थेने विजय मल्ल्या क्रिकेट मॅच पाहण्यासाठी मैदानात जात असतानाचे फोटो शेअर केले आहेत. विजय मल्ल्या भारतात असताना राज्यसभेचा सदस्य होता. किंगफिशर एअरलाइन्स समूह कर्जबाजारी झाल्यानंतर मल्ल्याचे भरपूर हाल झाले. अनेक बँकांचे कोटयावधी रूपयांचे कर्ज थकविल्यानंतर मल्ल्याने भारताबाहेर पलायन केले. मोदी सरकारने मल्ल्याच्या अडचणीत प्रचंड वाढ केली. त्याची भारतात असलेली संपत्‍ती जप्‍त करण्यात आली. भारत सरकार करीत असलेल्या कारवाईला कंटाळून मल्ल्याने संताप देखील व्यक्‍त केला होता. कर्जबाजारी झाल्यानंतर देखील विजय मल्ल्या त्याचे शौक पूर्ण करीत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय
पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे
दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

Loading...
You might also like