टीम इंडियाच्या ‘भगव्या’ जर्सीचे ‘हे’ फिचर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास पाच सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ८९ धावांनी विजय मिळवत आपला तिसरा विजय साजरा केला.

वर्ल्ड कप २०१९ मधील गुणतालिकेत १० पॉईंट्ससह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नऊ – आठ पॉईंट्स मिळवत न्यूझीलंड आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. त्यानंतर यजमान इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे. जवळपास अर्धी स्पर्धा पार पडली. सेमीफायनलमध्ये कोणते संघ पोहोचणार आहेत याचा उलगडा होण्यास सुरुवात झाली आहे.

भारतीय संघाचे पाच सामने बाकी असून भारत यानंतर अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, वेस्ट इंडिज यांच्याबरोबर खेळणार आहे. त्यादरम्यान ३० जून रोजी यजमान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग निळा असल्याने भारतीय संघ या सामन्यात भगव्या रंगाची जर्सी घालणार आहे. त्यानंतर आता या जर्सीचे अधिकृत फोटो समोर आले आहे.

भारतीय चाहते याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर भारतीय चाहत्यांची हि प्रतिक्षा संपली असून याचे अधिकृत फोटो आयसीसीने आपल्या ट्विटरवरून पोस्ट केले आहेत. भारतीय संघ सध्या निळ्या रंगाच्या जर्सीत खेळत असून आता ३० तारखेला होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार असून भारतीय संघाच्या जर्सीचे हात ऑरेंज रंगाचे असतील, तर कॉलर निळ्या रंगाची असेल.

दरम्यान, भारताचा आज अफगाणिस्तानशी सामना होणार आहे. या सामन्यातही भारतीय संघ ऑरेंज जर्सी परिधान करेल अशी चर्चा होती, परंतु या सामन्यात अफगाणिस्तान अवे जर्सी घालणार आहे. त्यामुळे भारतीय संघ फक्त इंग्लंडविरुद्ध आपल्याला या जर्सीत दिसून येईल.

https://twitter.com/Live_CWC_2019/status/1142268095291113472

आरोग्यविषयक वृत्त

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

सिने जगत

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

मोगॅम्बो खुश हुवा ! गुगलचे ‘डुडल’ द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन