ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या ‘या’ दिग्गज खेळाडूने सांगितले विराट कोहली म्हणजे ‘आजचा देव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडचा माजी ऑफ स्पिनर गोलंदाज ग्रॅमी स्वान याने टीम इंडिया चा कर्णधार विराट कोहली यास आधुनिक युगाचा देव म्हटले आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यात कोहलीच्या इमानदारीने प्रभावित होऊन त्याने हे वक्तव्य केले आहे ज्यामध्ये त्याने कोहलीला ‘आधुनिक युगाचा जीसस’ असे म्हणत ‘येशू ख्रिस्ताची’ उपमा दिली आहे. एका जाहीर कार्यक्रमात त्याने हे वक्तव्य केले.

काय म्हटले स्वान ने :
स्वान ने म्हटले की बॅटिंग करताना जेव्हा तुमच्या बॅट ला बॉलचा स्पर्श होतो तेव्हा आपल्याला ते जाणवते आणि माहित असते. असे असताना देखील स्वतःला नाबाद म्हणणाऱ्यांचा मला तिरस्कार वाटतो. त्याचबरोबर त्यांनी म्हटले की पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहलीच्या बॅट ला बॉल चा स्पर्श झालेला नव्हता तरीदेखील पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता तो मैदानावरून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची हि कृती त्याच्यातील खिलाडूवृत्ती दाखवते. त्याचबरोबर त्यांनी म्हटले,’माझ्यासाठी विराट आधुनिक काळातील जीजस आहे.’

नेमकं काय घडलं होतं :
टीम इंडिया चा कर्णधार विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना ४७ व्या ओव्हर मध्ये पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमिर च्या बाउंसर वर विकेटकीपर ने कॅच घेतल्याने आउट झाला. त्यावेळी मैदान सोडताना त्याने पंचांच्या निर्णयाचीही वाट पहिली नाही. रिप्लाय व्हिडिओमध्ये पहिले असता मात्र बॅट आणि बॉल चा कोठेच संपर्क झाला नसल्याचे आढळून आले. यावेळी विराटने कसल्यातरी प्रकारचा आवाज ऐकल्यामुळे बाद असल्याचे समजून पंचांच्या निर्णयाची वाट न बघता तो मैदानवरुन निघून गेला असे बोलले गेले. ड्रेसिंगरूम मध्ये परतल्यावर मात्र त्याने इशारा करून बॅट च्या हॅण्डलला बॉल घासून गेल्याचे स्पष्ट केले.

या घटनेनंतर कोहलीचा हा निर्णय पाहून सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी आणि नागरिकांनी कोहलीच्या या खिलाडूवृत्तीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी हारवून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. पाकिस्तानने भारताच्या विरोधात आत्तापर्यंत वर्ल्ड कप मध्ये झालेल्या सर्व ७ सामन्यांमध्ये पाकिस्तानवर विजय प्राप्त केला आहे.

साध्या चालू असलेल्या वर्ल्ड कप मध्ये झालेल्या पाचही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवलेला असून भारताचा पुढील सामना २७ जून रोजी वेस्टइंडीज च्या विरोधात असणार आहे.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे