कॅप्टन विराट कोहलीचा नवा ‘विक्रम’ ! (व्हिडीओ)

दुबई : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्था आयसीसीने २०१९च्या वर्ल्डकपच्या डिजिटल म्हणजे टीव्ही, मोबाईलवरील प्रेक्षकांचा आकडा जाहिर केला आहे. इंग्लंड आणि वेस्ल येथे झालेली स्पर्धा जगातील अधिकाधिक चाहत्यांनी पाहिली आहे. तेथील सामना आयसीसीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर एकूण ३.६ बिलियान लोकांनी पाहिले आहे. या आकडेवारीमधील १ बिलियन लोकांनी आयसीसीच्या ऑफिशियल डिजिटल क्लीपवर पाहिले आहे. तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवरही ३ मिलियन लोकांनी व्हीडिओ पाहिले आहेत. युट्यूबवरही मोठ्या प्रमाणात लोकांनी व्हीडिओही पाहिले आहेत. तर फेसबुकवरील आकडाही मोठा आहे.

व्हीडिओ बघण्याची आकडेवारी काढली असून या सर्व प्रक्रियेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा अधीक हिट झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात स्टीव्ह स्मिथ सोबत घडलेल्या किस्स्यामुळे विराट हिट ठरला आहे. हा व्हीडिओ आकड्यातील सर्वाधिक पाहिला गेलेला व्हीडिओ ठरला आहे. हा व्हीडिओ भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातील आहे. या व्हीडिओमध्ये विराट हा फलंदाजी करत आहेत तेव्हा भारतीय चाहते स्टीव्ह स्मीथला डिवचत होते. तेव्हा विराटने नाराज होत प्रेक्षकांचे कान टोचत त्यांना त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी सांगितले. असा हा व्हिडिओ आहे. या व्हीडिओमधून विराटची खिलाडू वृत्ती दिसत आहे. तर त्यासोबत भारत विरुद्ध पाकिस्तान झालेल्या सामना पाहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

दरम्यान, भारताच्या आणि पाकिस्तानच्या सामना अधिक लोकांनी पाहिला. या सामन्यावर तब्बल २.९ मिलियन लोकांनी यावर ट्विट्स केले आहेत. त्यात रिट्वीट रिप्लाय असे अनेक आहेत. त्यानंतर विश्वचषकातील शेवटचा सामना आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड झालेला सामनाही अधिकाधिक लोकांनी पाहिला होता.

आरोग्यविषयक वृत्त –