ICC World Cup 2019 : …म्हणून धोनी निवृत्तीचा निर्णय घेत नसावा : माजी कॅप्टन स्टीव वॉ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या क्रिकेट जगतात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर चर्चा सुरु आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर धोनी आपली निवृत्ती जाहिर करणार असे म्हटले जात होते. मात्र धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल अद्यापही काही सांगितले नाही. त्यामुळे धोनीने खरंच निवृत्ती घ्यायला हवी की नको, यावर कमेंट्सचा पाऊस सोशल मीडियावर होत आहे. तर भारतीय संघातील माजी खेळाडूंनीही आपली मते मांडली.

पण धोनीला निवृत्तीचा निर्णय जाहिर करणे अवघड जात असावे, असं ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी म्हटलं आहे. यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भारतामध्ये महान क्रिकेटपटूंना निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे नसते. कारण भारतामध्ये महान क्रिकेटपटूला देवासारखे पुजले जाते. त्यामुळे एकदा आपली प्रतिमा देवासारखी झाली की त्यानंतर क्रिकेट सोडायचा निर्णय लवकर घेतला जात नाही, असं त्यांनी म्हटलं. तर १४० कोटी लोक भारतात आहेत. ज्यामधील बहुतांशी लोक धोनीचे चाहते असतील. त्यामुळेच धोनीला हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. कारण जेव्हा लोक तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवतात तेव्हा निवृत्तीचा निर्णय घेणे, सोपे नसते, असंही स्टीव्ह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विश्वचषकात भारताने दमदार कामगिरी करत गुणतक्त्यावर पहिल्या स्थानावर आला होता. सुरुवातीच्या ७ सामन्यात भारताने विजयश्री मिळवली होती. तर त्यातील १ सामना गमावला होता. तर एक सामना रद्द झाला होता. तोही सामना न्यूझीलंडसोबतचाच होता. त्यामुळे उपांत्य फेरीत झालेला सामना हा न्यूझीलंड आणि भारताचा पहिलाच सामना होता. त्यातही भारतीय संघाच्या सलामीवीरांसह पहिल्या फळीतील खेळाडूंचे प्रदर्शन निराशाजनक झाले. त्यामुळे हातातून जाणारा सामना रवींद्र जडेजा आणि धोनीने चांगला सावरला होता. मात्र जडेजा आणि धोनी बाद झाल्यावर पुढील गोलंदाजांना खेळपट्टीवर टीकता आले नाही. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर हा विश्वचषक धोनीचा शेवटचा असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या