World Cup 2019 : विजेता संघ होणार ‘मालामाल’ ; ICC कडून ‘या’ बंपर इनामाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात येत्या ३० मे पासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४६ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले असतात. यंदा वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमला तब्बल २८ कोटी म्हणजे ४ मिलियन डॉलरचं बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेच्या इतिहासातील आजपर्यंतची हि सर्वोच्च रक्कम आहे. तर उपविजेत्या टीमलाही १४ कोटी रूपयांचा पुरस्कार मिळेल.

३० मे पासून सुरु होणारी हि स्पर्धा १६ जुलैपर्यंत रंगणार आहे. जवळपास ७० कोटी रक्कम ही बक्षिसाच्या रकमेवर खर्च होणार आहे. तर सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघांना जवळपास ५-५ कोटींचं बक्षीस मिळणार आहेत. हे बक्षीस रकमेच्या स्वरूपात असतील. इतकेच नाही तर साखळी सामन्यात विजय मिळवणाऱ्या प्रत्येक संघाला बक्षीस दिले जाणार आहे. साखळी सामन्यातून पुढील फेरीत जाणाऱ्या संघाला सात लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारताने आपल्या १५ सदस्यीय संघाची निवड केली असून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळेल. २२ मे रोजी भारतीय संघ या स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होईल.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मध्ये अशा प्रकारे असतील पुरस्कार

१) वर्ल्डकप विजेती टीमः वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमला २८ कोटी रूपये म्हणजेच ४ मिलियन यूएस डॉलर मिळतील.

२) उप-विजेता संघ जवळपास १४ कोटी रूपये म्हणजेच २ मिलियन यूएस डॉलर मिळतील.

३) सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या २ टीमना पाच-पाच कोटी रूपये म्हणजे ८ लाख यूएस डॉलर मिळतील.

४) स्पर्धेच्या ४५ मॅचमध्ये जिंकणाऱ्या प्रत्येक टीमला जवळपास २८ लाख रूपये म्हणजेच ४० हजार यूएस डॉलर बक्षीस म्हणून मिळतील.

५) साखळी सामने जिंकून पुढे क्वालिफाय करणाऱ्या संघांना जवळपास ७ कोटी रूपये म्हणजेच १ लाख यूएस डॉलर मिळतील.