ICC World Cup 2019 : १९८६ मध्ये ‘हॅन्ड ऑफ गॉड’मुळे इंग्लंडचा ‘पराभव’, मात्र २०१९ मध्ये ‘विजेते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील कालच्या फायनलमध्ये इंग्लंडने पहिल्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मात्र या सामन्यातील ४९ व्या षटकात घडलेल्या एका घटनेची सध्या क्रीडा रसिकांत फार मोठी चर्चा सुरु आहे. फुटबॉल असो किंवा वर्ल्डकप दोन्ही स्पर्धांत ‘हॅन्ड ऑफ गॉड’ मुळे मोठ्या प्रमाणात वाद होतात. त्याचप्रमाणे सामन्याला कलाटणी देखील मिळू शकते. १९८६ च्या वर्ल्डकप स्पर्धेत अशाचप्रकारे इंग्लंडला अर्जेंटिनाकडून २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. तशीच काहीशी घटना कालच्या सामन्यात घडली. मात्र या ‘हॅन्ड ऑफ गॉड’नेच इंग्लंडला या स्पर्धेत क्रिकेटचा नवीन बादशाहा बनवले.

१९८६ मध्ये ‘हँड ऑफ गॉड’ मुळे इंग्लंडचा पराभव –

१९८६ मध्ये खेळवण्यात आलेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार डियागो मॅरेडोना याने या स्पर्धेच्या फायनलमध्ये दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र यातील एक गोल विवादित राहिला होता. गोल करताना बॉल मॅरेडोनाच्या हाताला लागून गोलपोस्टमध्ये गेला होता मात्र अम्पायरचे याकडे लक्ष गेले नाही. मात्र सामन्यानंतर त्याने याविषयी बोलताना याला देवाची मर्जी म्हटले आणि या गोलला ‘हॅन्ड ऑफ गॉड’ म्हटले.

२०१९ मध्ये इंग्लंडला मिळाला विजय –

या सामन्यात २४२ धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडला शेवटच्या २ चेंडूंवर ९ धावांची आवश्यकता असताना स्टोकने फटका खेळल्यानंतर दोन धावा पळाल्या. मात्र मार्टिन गप्टिलने थ्रो केल्यामुळे तो चेंडू बेन स्टोक्सच्या हाताला लागून चौकार झाला आणि अशाप्रकारे त्या चेंडूवर इंग्लंडला ६ धावा मिळाल्या. त्यानंतर २ चेंडूवर २ धावा घेत इंग्लंडने हा सामना टाय केला. आणि अखेर सुपर ओव्हरमध्ये देखील टाय झाल्यानंतर इंग्लंडने बाउंड्रीच्या बळावर विजय मिळवला. त्यामुळे १९८६ मध्ये फुटबॉल वर्ल्डकपमध्ये हॅन्ड ऑफ गॉडमुळे स्वीकारावा लागलेल्या पराभवानंतर काल याच पद्धतीने इंग्लंडला विजय मिळवता आला.

सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या