home page top 1

ICC World Cup 2019 : इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ खेळाडूने एका डावात १७ छक्के ‘ठोकले’ ; रोहित शर्मा, गेल व डिविलियर्सचे ‘रेकॉर्ड’ ब्रेक

मँचेस्टर : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यात इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनने धमाकेदार खेळी केली आहे. मॉर्गनने ७१ चेंडूत १४८ धावांची शानदार खेळी केली आहे. या खेळीत मॉर्गनने १७ उत्तुंग षटकार मारत एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. या खेळाच्या जोरावर इंग्लंडने अफगाणिस्तानसमोर ३९८ धावांचे आव्हान उभे केले आहे. ही या वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे.

मॉर्गनने याबरोबरच एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. मॉर्गनने रोहित शर्मा, एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेल यांचा १६ षटकारांचा विक्रम मोडला आहे.

भारताचा सलामीवीर फलंदाज हिट मॅन रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ मध्ये २०९ धावांची खेळी करताना १६ षटकार मारले होते. डिव्हिलियर्सने ४४ चेंडूत १४९ धावांची खेळी करताना १६ षटकार मारले होते. वेस्टइंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने जिम्बाब्वे विरोधात २१५ धावांची खेळी करताना १६ उत्तुंग षटकार लगावले होते.

वर्ल्डकपमधील चौथे वेगवान शतक

मॉर्गनने ५७ चेंडूत शतक पूर्ण केले. हे वर्ल्डकपमधील चौथे वेगवान शतक आहे. वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम केविन ओब्रायन याच्या नावावर आहे. ओब्रायनने इंग्लंडविरुद्ध ५० चेंडूत शतक पूर्ण केले होते.ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने ५१ चेंडूत तर एबी डीविलियर्सने ५२ चेंडूत शतक पूर्ण केले होते. ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

एकदिवसीय सामन्यात एका डावातील सर्वाधिक षटकार

सामन्यातील पहिल्या डावामध्ये २५ षटकार मारण्यात आले. हे सामन्याच्या पहिल्या डावात मारण्यात आलेले एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक षटकार आहेत. या आधी इंग्लंडनेच याच वर्षात वेस्टइंडीज विरुद्ध एका डावामध्ये २४ षटकार मारले होते.

सिनेजगत

सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची तारीख पुन्हा ‘चेंज’, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार

Video : ‘दबंग’ सलमान खानचा ‘हा’ व्हिडीओ प्रचंड ‘व्हायरल’ 

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

 #YogaDay2019 : दीर्घायुष्य प्राप्त करू शकता, धरा योगाची वाट

#YogaDay2019 : दीर्घायुष्य प्राप्त करू शकता, धरा योगाची वाट

#YogaDay2019 : ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

#YogaDay2019 : पुरूषांपेक्षा महिलांना योगभ्यासाची जास्त गरज

#YogaDay2019 : निरामय जीवनासाठी ज्येष्ठांनीही करावा योगा

 

Loading...
You might also like