वर्ल्डकपमध्ये पाऊस ठरतोय ‘खलनायक’, चाहत्यांकडून पॉईंट टेबलमध्ये पाऊस ‘टॉप’वर

लंडन : वृत्त संस्था – ICC वर्ल्डकप २०१९ मध्ये होत असलेल्या सामन्यात पावसाचीच जास्त चर्चा आहे. आतापर्यंत पावसाच्या कारणामुळे चार सामने रद्द झाले आहेत. यांमुळे क्रिकेट चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांनी आयोजकांबरोबरच पाऊसालाही लक्ष्य केले आहे.

एका चाहत्याने तर पॉईंट्स टेबलमध्ये पाऊसाला टॉपवर ठेवले आहे. यानंतर या प्रकारच्या पॉईंट्स टेबलचा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये  दाखवण्यात आले आहे की, पावसाने तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. यांमुळे पाऊसाला ६ गुण मिळाले असून पावसाला पहिल्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. लिस्टमध्ये न्यूझीलंडच्या जागी पावसाला दाखवण्यात आले आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द, दोन्ही संघाला प्रत्येकी  १ गुण

आतापर्यंत दक्षिण अफ्रीका-वेस्टइंडीज, श्रीलंका-पाकिस्तान आणि श्रीलंका-बांग्लादेश हे सामने पाऊसामुळे रद्द झाले आहेत. यानंतर गुरुवारचा भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना देखील रद्द झाला आहे.

आयसीसीने पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे की, पावसाच्या कारणास्तव राखीव दिवस ठेवण्याचा कोणताही विचार नाही. आयसीसीने म्हंटले की, प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवल्यास नियोजनात बऱ्याच समस्या निर्माण होतील.