ICC World Cup 2019 : ‘मौसम बडा बेईमान’, IND Vs NZ आज देखील रद्द ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना आज पुढे खेळवण्यात येणार आहे. काल न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४६. १ षटकात ५ बाद २११ धावांची मजल मारली असताना पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुन्हा सामना सुरु झाला नाही. त्यामुळे आज उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. काल ज्या स्थितीत सामना होता त्याच्यापुढे तो खेळवण्यात येणार आहे.

या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असल्याने आज भारतीय चाहते पाऊस न पडण्याची अपेक्षा करत आहेत. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल रात्रीपासून मैदानावर पाऊस पडला नसल्याची माहिती समोर येत आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्यामुळेच क्रीडा रसिकांच्या आशेवर देखील आज पाणी फिरण्याची शक्यता आहे. कालच्या घटनेनंतर प्रेक्षक तसेच क्रीडा रसिक मोठ्या प्रमाणावर नाराज असून सोशल मीडियावर यासंदर्भात आयसीसीवर टीका केली आहे. काही जणांनी तर आयसीसीला विनंती करताना म्हटले कि, पुढील वेळी पाऊस नसणाऱ्या ठिकाणी वर्ल्डकपचं आयोजन करावे.

निरभ्र आकाश मात्र पावसाचा अंदाज

राखीव दिवशी देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तेथील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सामना सुरु झाल्यानंतर काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like