ICC World Cup 2019 : ‘त्या’ मुळे कॅप्टन विराट कोहलीला ‘दंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला सामन्याच्या २५ % रक्कमेचा दंड झाला आहे. कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात आयसीसी आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केले आहे. अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात कोहलीने अंपायरकडे जास्तीचे अपील केले होते.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार कोहलीला आयसीसी आचारसंहिता नियम २.१ अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे. या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडूने अंपायरकडे जास्त अपील केल्यास खेळाडूला दंड ठोठावला जातो.

https://twitter.com/ICC/status/1142731889532383232

शनिवारी झालेल्या सामन्यातील २९ व्या ओव्हरमध्ये कोहलीने LBW चे अंपायर अलीम डारकडे जोरदार अपील केले त्यामुळे कोहलीला दंड ठोठावण्यात आला.

कोहलीने सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यासमोर गुन्हा कबूल केला आहे. यामुळे कोहलीविरोधात अधिकृतपणे सुनावणी घेण्याची गरज नाही.

याबरोबरच कोहलीच्या खात्यात एक डीमीरीट पॉईंट देखील जोडला आहे. सप्टेंबर २०१६ च्या नव्या आचारसंहितेनुसार कोहली दुसऱ्या वेळेस दोषी ठरला आहे. जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रिटोरिया येथे झालेल्या कसोटी सामन्यात कोहली नियमाचे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरला होता.

स्तर १ च्या नियमानुसार जास्तीजास्त सामन्याच्या ५० % फीस चा दंड केला जातो त्याचबरोबर खेळाडूंवर एक किंवा दोन डिमरीट पॉईंट लावला जातो.

आरोग्य विषयक वृत्त

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण