निवृत्‍तीच्या चर्चा चालू पण महेंद्रसिंह धोनी वेस्टइंडिज दौर्‍याला मुकणार

मुंबई : वृत्तसंस्था – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. वर्ल्डकप झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेईल असे बोलले जात होते. पण महेंद्रसिंग धोनीकडून निवृत्तीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. वर्ल्डकपमध्ये सेमीफायनल सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता भारतीय संघ वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. १७ आणि १८ जुलैला निवड समितीची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत वेस्टइंडिज दौऱ्यासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या निवडीची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे १७ तारखेच्या आधीच धोनीच्या निवृत्तीचा निर्णय कळू शकतो. BCCI धोनीच्या घोषणेचीच वाट पाहत आहे.

विराटसह अनेक खेळाडूंना विश्रांती
वर्ल्डकपमधून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर आता कोणाला संघात ठेवले जाणार कोणाला वगळले जाणार याची जोरात चर्चा सध्या सुरु आहे. वेस्टइंडीज दौऱ्यासाठी विराटसहित काही खेळाडूंना विश्रांती देण्यात येऊ शकते. अशावेळेस विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा टी २० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधार पद सांभाळेल.

सूत्रांच्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, मोहम्मद शमी यांना देखील विश्रांती दिली जाऊ शकते. हे खेळाडू सातत्याने क्रिकेट खेळत आले आहेत. धोनी निवृत्तीची घोषणा ट्विटरवरून शेअर करेल की पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीची घोषणा करेल? याची माध्यमांना प्रतीक्षा आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलीयामध्ये टी २० वर्ल्डकप आहे. तो वर्ल्डकप धोनी खेळेल का? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

 

Loading...
You might also like