ICC World Cup 2019 : २७ धावा बनवताच सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा ‘हा’ रेकॉर्ड मोडणार रोहित शर्मा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनल सामना होत असून या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर भारताचा फलंदाज रोहित शर्मा याला उद्याच्या सामन्यात अनेक रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सध्या रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून या स्पर्धेत त्याने ५ शतके झळकावली असून वर्ल्डकप इतिहासात एका स्पर्धेत पाच शतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

या वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा भन्नाट फॉर्ममध्ये असून या वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माने आतापर्यंत ८ सामन्यात ५ शतकांच्या मदतीने ६४७ धावा केल्या आहेत. जर त्याने या सेमीफायनलमध्ये २७ धावा केल्या तर एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे. त्याच्याकडे सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. सचिन तेंडुलकर याने २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्डकपमध्ये ६७३ धावा केल्या होत्या. ११ सामन्यांत त्याने या धावा केल्या होत्या. त्यामुळे कमी सामन्यांत त्याचा हा विक्रम मोडण्याची देखील संधी रोहित शर्मा यांच्याकडे आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर याचा वर्ल्डकपमधील सहा शतकांचा रेकॉर्ड देखील धोक्यात आहे.

रोहित शर्मा याने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ६ शतके केली असून आणखी १ शतक केल्यास तो सर्वाधिक शतके करणारा भारतीय खेळाडू ठरणार आहे. रोहित शर्माने वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर याने वर्ल्डकपमध्ये एकूण ४५ सामने खेळले असून त्याने यात २२७८ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा याने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण १६ सामने खेळले असून त्याने या सामन्यात २३ धावा केल्यास सर्वात कमी सामन्यात १००० धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत फक्त २१ फलंदाजांनी वर्ल्डकपमध्ये १००० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जर रोहितने हा विक्रम केल्यास तो २२ वा फलंदाज ठरणार आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या सामन्यात तो हा विक्रम मोडतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

Loading...
You might also like