क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर ! ICC नं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या

मुंबई : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वतीनं एक मोठा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. क्रिकेट प्रेमींना आता आयपीएलबरोबरच दरवर्षी टी -20 वर्ल्ड कप पाहण्याची संधी मिळणार आहे. याबाबत आयसीसीने अंतिम निर्णय घेतला नसला तरी, यावर विचारविनिमय सुरु आहे. आयसीसीच्या नव्याने जाहीर केलेल्या प्रस्तावात प्रत्येक वर्षी टी – 20 वर्ल्ड कप तर दर तीन वर्षांनी एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे.

आयसीसीला 2023 आणि 2028 दरम्यान जागतिक मीडिया अधिकार बाजारात प्रवेश करायचा आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी स्टार स्पोर्टससोबत आयसीसीची बोलणी सुरु आहेत. दरम्यान आयसीसीने मांडलेल्या प्रस्तावाशी बीसीसीआय सहमत नाही. त्यामुळे दोघांमध्ये या प्रस्तावरून वाद सुरु आहेत. आयसीसीच्या प्रस्तावामुळं बीसीसीआयच्या कार्यक्रमावर आणि मिडिया अधिकारांवर परिणाम होऊ शकतो.

सध्या वर्ल्ड कपचे आयोजन चार वर्षातून एकदा करण्यात येते. तर टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन दोन वर्षातून एकदा करण्यात येते. 2007 मध्ये पहिला वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. त्यानंतर दुसरा 2009 मध्ये. 2010 मध्ये एका वर्षात तिसऱ्या वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले. मात्र, आयसीसीच्या एफटीपी कॅलेंडर पाहता दरवर्षी टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करणे इतर देशांची डोकेदुखी ठरू शकते.

काय आहे एफटीपी कॅलेंडर
आयसीसी आणि इतर सदस्य पाच वर्षासाठी वेग-वेगळ्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करते. या सामन्यांचे वेळापत्रक आधीच तयार करण्यात येते. त्यामुळे आयसीसीने सादर केलेल्या प्रस्तावाला बीसीसीआयने नकार दिला आहे. यातच बीसीसीआयच्या वतीने आयपीएल स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपचा फटका आयपीएललाही बसू शकतो.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

You might also like