काय सांगता ! येथील मुलींशी लग्न केल्यानंतर मिळतात ३ लाख रुपये

लखनऊ : वृत्तसंस्था – लग्नानंतर मुलं पती होतात. परंतु एक देश असा आहे, जेथील मुलींशी लग्न केलं तर मुलं लखपती होऊ शकतात. आइसलँडमधील सरकार आपल्या देशातील मुलींसोबत लग्न करणाऱ्या मुलांना 3 लाख 33 हजार रुपये देत आहे. असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या मेसेजमध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्या विदेशी मुलाने आइसलँडमधील मुलीशी लग्न केलं तर त्या कपलला आयुष्यभर 3 लाख 33 हजार प्रत्येक महिन्याला मिळणार आहे.

व्हायरल होणाऱ्या या मेसेजनुसार, दुसऱ्या देशातील मुलांनी आइसलँडमधील मुलींशी लग्न केलं तर सरकार 5 हजार डॉलर म्हणजेच 3 लाख 33 हजार रुपये देणार आहे याचे कारण म्हणजे या देशात मुलांची संख्या कमी आहे.

सर्वात आधी 2016 साली स्पिरिट विस्पर्स नावाच्या एका वेबसाईटने हा मेसेज छापला होता. या वेबसाईटने आपल्या आर्टीकलमध्ये असा दावा केला होता की, उत्तर आफ्रिकेच्या लोकांना या स्कीममध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय आफ्रिकेतील एका वेबसाईटनेही ही एक वेगळी ऑफर म्हणून हा मेसेज चालवला होता. यानंतर snopes.com नावाची वेबसाईट जी फेक बातम्यां आणि फोटोंची पडताळणी करते तिने हा खोटा मेसेज असल्याचं सांगितलं होतं.

हा मेसेज खोटा असल्याचा खुलासा झाल्यानंतर आइसलँडमधील मुलींची वैतागवाडी अजूनच वाढली. कारण हा मेसेज समोर आल्यानंतर दुसऱ्या देशातील मुलांनी या देशातील मुलींना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला सुरुवात केली. काही मुलं फेसबुकवरच मुलींना लग्नासाठी प्रपोज करु लागले. जगातील उत्कृष्ट पर्यटनस्थळांमध्ये आइसलँडचं नाव घेतलं जातं. या देशातील मुलीही खूप सुंदर आहेत.

दूतावासांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
दूतावासांनी या खोट्या बातमीचा पाठपुरावा केला. आइसलँडशी निगडीत हे प्रकरण डेनमार्कच्या दूतावासांनीही पाहिलं आणि या खोट्या बातमीविषयी त्यांनी फेसबुकवर स्पष्टीकरणही दिलं. त्यांनी सांगितले होते की, आइसलँडच्या सरकारने अशी कोणतीही ऑफर दिलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –