आयपीएलच्या सामन्यावेळी इचलकरंजीत सट्टेबाजीचा धंदा जोरात

इचलकरंजीः पोलीसनामा आॅनलाईन
आयपीएल सामन्याच्यावेळी इचलकरंजीत सट्टेबाजीचा धंदा जोरात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी मॅचच्यावेळी क्रिकेटवर सट्टा लावल्या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले असून राजू गडकरी असे या युवकाचे नाव आहे. राॅयल चॅलेंजर्स बंगळुर आणि दिल्ली डेअर डेविल्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्याच्यावेळी सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवाजी नगर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्तरित्या कारवाई करत, सट्ट्याचे पैसे घेताना राजू गडकरीला रंगेहाथ पकडले. तसेच पोलिसांनी बेटींगच्या अकड्यावरुन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे समजते.