खुशखबर ! ‘या’ बँकांनी ग्राहकांनी दिलं दिवाळी गिफ्ट, 1 लाख रूपयांचा विमा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीच्या निमित्ताने अनेक बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स देत आहेत. यात एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेचा देखील समावेश आहे. जाणून घेऊयात या बँकांनी ग्राहकांसाठी नेमकी काय खुशखबर दिली आहे.

ICICI बँकेने ‘एफडी हेल्थ’ नावाने एक खास प्रकारची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत बँक धारकांना फिक्स डिपॉझिटवर 6.9 % वर्षाला व्याज मिळणार आहे. याअंतर्गत एफडी केल्यानंतर आपल्याला एक वर्षासाठी एक लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स मिळणार आहे. यासाठी दोन ते तीन लाखांची एफडी असणे गरजेचे आहे आणि याचा कालावधी कमीतकमी दोन वर्षांसाठीचा असेल.

18 ते 50 वर्षांपर्यंतचा कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजने अंतर्गत 33 प्रकारच्या आजारांवर एका वर्षासाठी मोफत उपचार केले जाणार आहेत. किडनी फेल्यूर, कॅन्सर सारख्या अनेक मोठं मोठ्या आजारांवर या अंतर्गत उपचार केले जाणार आहेत याबाबतची अधिक माहिती https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fdxtra/fixed-deposit-health.page?#toptitle या लिंक वर उपलब्ध आहे.

HDFC कडूनही खास भेट –

घरासाठी कर्ज देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या HDFC बँकेने देखील आपल्या कर्जावरील व्याज दरावर 0.10 % ने कपात केली आहे. या कपाती अंतर्गत पगारी ग्राहकांसाठी कर्जाचा व्याजदर खालच्या पातळीवर 8.25 % आणि वरच्या पातळीवर 8.65 % इतका आकारला जाणार आहे. 15 ऑक्टोबर पासून हा नियम लागू होणार आहे.

याचा लाभ एचडीएफसीच्या जुन्या ग्राहकांसोबत नव्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना देखील होणार आहे. HDFC आधी आंध्र बँकेने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ लेंडिंग रेट (एमसीएलआर) वर 0.10 % कपात केली होती. बँकेने रेपो दरासंबंधी देखील सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिला होता. नव्या अनेक योजनांनुसार आणि दरामध्ये केलेल्या बदलांमुळे ग्राहकांनी घेतलेल्या कर्जावर व्याज दर पहिल्यापेक्षा कमी द्यावा लागणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी