ICICI बँक घोटाळा : माजी CEO चंदा कोचर यांचे पती दीपक यांना ED कडून अटक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अंमलबजावणी संचालनालयाने आयसीआयसीआय बँकेचे माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे.  ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या पतीविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) गुन्हा दाखल केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आज दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई शाखेने अटक केली.

काय आहे प्रकरण ?
माहितीनुसार, चंदा कोचर यांच्यावर आरोप होते कि, पदाचा गैरवापर करत अनियमितपणे व्हिडीओकॉन ग्रुपला 1875 कोटींचे कर्ज दिले होते. ईडीने पीएमएलए अंतर्गत चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत आणि इतरांविरूद्ध बँक कर्जाच्या फसवणूकीसाठी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात, न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण समितीने 29 जानेवारी 2019 रोजी चंदा कोचर यांनी बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन करून व्हिडिओकॉनला कर्ज दिले, त्यातील एक भाग तिच्या पतीने चालविणाऱ्या कंपनीला दिला होता आणि ही स्वारस्याच्या विवादाची बाब आहे.