SBI, HDFC नंतर आता ‘या’ बँकेचीही गृहकर्जावरील व्याजदरात कपात, 10 वर्षांतील सर्वांत स्वस्त दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्यवेळ आहे. कारण आता ICICI बँकेने गृहकर्जावरील दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ICICI बँकेने हे दर कमी करून आता हा दर 10 वर्षांतील सर्वांत खालच्या स्तरावर गेला आहे. बँकेच्या या निर्णयाचा फायदा अनेकांना होणार आहे.

भारतीय स्टेट बँक, HDFC बँक, कोटक बँक यांसारख्या बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली होती. त्यानंतर आता ICICI बँकेने निर्णय घेतला आहे. बँकेने या दरात कपात करून नवा दर 6.70 वर गेला आहे. गेल्या 10 वर्षांतील सर्वात स्वस्त गृहकर्जावरील व्याजदर आहे. हे नवे दर 5 मार्चपासून लागू होणार आहे. याबाबत ICICI बँकेने सांगितले, की 75 लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना या परवडणाऱ्या दराचा लाभ होणार आहे. 75 लाख रुपयांवर कर्ज घेण्यासाठी बँकेने 6.75 टक्के व्याजदर निश्चित केले आहे. हे परवडणारे दर सध्या 31 मार्चपर्यंत मिळणार आहे.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) रेपो दर सध्या 4 टक्के आहे. हे दर म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज मिळते. म्हणजेच रिझर्व्ह बँकेकडूनही स्वस्तात कर्ज दिले जात आहे. त्यामुळे संबंधित बँकांही याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.

SBI, HDFC कोटक बँकेनेही कर्ज केले स्वस्त

भारतीय स्टेट बँकेने सिबिल स्कोअरच्या आधारे गृहकर्जावर सुमारे 0.1 टक्के सवलत देण्याची घोषणा केली. त्यामुळे SBI चे गृहकर्ज किमान 6.70 व्याजदराने कमी झाला आहे. मात्र, ही सवलत फक्त 31 मार्च, 2021 पर्यंतच असणार असल्याचे सांगितले. याशिवाय 100 टक्के प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली. यापूर्वी HDFC बँकेनेही गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता HDFC बँकेकडून 6.75 टक्के या दराने गृहकर्ज मिळू शकेल.