ICICI Bank | आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना फायदा, आता ‘या’ कामांसाठी लागणार नाही चार्ज

नवी दिल्ली : ICICI Bank | प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना चांगली बातमी दिली आहे. बँकेने आपल्या अनेक सेवांच्या शुल्कांमध्ये बदल केला आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांना विशेषता क्रेडिट कार्ड धारक ग्राहकांना मोठा लाभ मिळणार आहे आणि खिशावरील खर्चाचा भार देखील हलका होणार आहे.(ICICI Bank)

क्रेडिट कार्ड रिप्लेस केल्यास जास्त शुल्क

आयसीआयसीआय बँकेने सांगितले की, त्यांनी अनेक क्रेडिट कार्डच्या सेवांच्या शुल्कात बदल केला आहे. हे बदल १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहेत. यापैकी काही बदलांमुळे ग्राहकांना फायदा होणार आहे, कारण बँकेने अनेक शुल्क रद्द केले आहेत.

दुसरीकडे काही सेवांचे शुल्क वाढवले सुद्धा आहे. बँकेने क्रेडिट कार्ड रिप्लेसमेंट चार्ज १०० रुपयांनी वाढवून २०० रुपये केला आहे.

आयसीआयसीआय बँकेने क्रेडिट कार्ड यूजर्ससाठी जी शुल्क १ जुलैपासून बंद करण्याची घोषणा केली आहे, ती अशाप्रकारची आहेत :

१ : चेक अथवा कॅश पिकअपवर लागणारे १०० रुपयांचे शुल्क
२ : चार्ज स्लिप मागितल्यास लागणारे १०० रुपयांचे शुल्क
३ : डायल ए ड्राफ्ट सेवेसाठी लागणारे किमान ३०० रुपयांचे शुल्क
४ : आऊट स्टेशन चेक प्रोसेसिंग फी (किमान १०० रुपये अथवा चेकच्या मुल्याच्या १ टक्का)
५ : ३ महिन्यापेक्षा जुन्या डुप्लिकेट स्टेटमेंटसाठी १०० रुपयांचे शुल्क

पुढील महिन्यापासून लागू होती हे बदल

आयसीआयसीआय बँकेद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता त्यांच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांकडून हे ५ प्रकारचे शुल्क वसूल केले जाणार नाही. बँकेने या पाच सेवांसाठीचे शुल्क बंद केले आहे. हे बदल पुढील महिन्यात १ जुलै २०२४ पासून लागू होतील.

लेट पेमेंट पेनल्टीवर सुद्धा दिलासा

आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे लेट पेमेंटवर लागणारी पेनल्टी आता एकूण जमा राशीच्या हिशोबाने लागणार नाही. यासाठी आऊटस्टँडिंग अमाऊंटचे कॅलक्युलेशन संबंधित बिलिंग पीरियडच्या एकुण जमामधून त्या कालावधी दरम्यान प्राप्त जमा कमी करून केले जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar-EVM Machine Pooja | रुपाली चाकणकरांची ईव्हीएम पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Ranjangaon Ganpati Pune Crime News | ‘ज्वेलर्स’च्या दुकानाचे शटर उचकटून 16 लाख 25 हजारांचे दागिने चोरीला; रांजणगाव गणपती येथील घटना

Anil Deshmukh On Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मृत तरुण-तरुणी दारु पिऊन गाडी चालवत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न’ माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

Bibvewadi Gangadham Chowk Pune News | गंगाधाम चौक परिसरातील रस्ते भविष्यात होणार मृत्यूचे जाळे? वाढत्या जड वाहतुकीमुळे तीव्र उतारावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेउन प्रवास (Videos)