ICICI Bank सह 3 बँकांनी सुरू केली नवीन सुविधा ! आता केवळ मोबाइल नंबरवरून पाठवू शकता 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि एयरटेल पेमेंट्स बँकेने (Airtel Payments Bank) पे टू कॉन्टॅक्ट (Pay to Contact) किंवा पे यूअर कॉन्टॅक्ट (Pay Your Contact) सर्व्हिस लाँच केली आहे. या नवीन सेवांतर्गत तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरद्वारे मित्र किंवा कोणत्याही नातेवाईकाला त्यांच्या मोबाइल नंबरवर पैसे पाठवू शकता. आतापर्यंत यूपीआयद्वारे पैसे पाठवण्यासाठी दुसर्‍याच्या बँक अकाऊंट डिटेल किंवा यूपीआय आयडीची आवश्यकता होती. या सर्व्हिसमुळे आता त्याची आवश्यकता राहणार नाही.

असे पाठवा पैसे

– सर्वप्रथम तुमच्या बँकेचे अ‍ॅप उघडा. नंतर Pay to Contact किंवा Pay Your Contact वर क्लिक करा.

– मोबाइलचे फोनबुक उघडा. नंतर ज्यांना पैसे पाठवायचे आहे त्यांचा नंबर निवडा.

– असे करताच बँकेचे अ‍ॅप आपोआप कॉन्टॅक्टचा युपीआय अ‍ॅड्रेस शोधून काढेल. मात्र, यासाठी सेंडरकडे सुद्धा युपीआय अ‍ॅड्रेस असावा.

– आता अमाऊंट आणि पासवर्ड टाका. यानंतर पैसे दुसर्‍या खात्यात जातील.

– बँकांनुसार, युपीआयच्या नवीन सर्व्हिसद्वारे पेमेंटच्या दरम्यान यूपीआय आयडी किंवा बँक डिटेलची आवश्यकता नसते.

– नवीन सर्व्हिसद्वारे कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना 50 हजार रुपयांपर्यंत ट्रान्सफर करण्याची सूट देईल.

– आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक रोज 1 लाख रुपयांपर्यंत ट्रान्सफर करू शकतात.

हे देखील वाचा

Pimpri Crime News | ‘प्रेयसीचा खून करून मृतदेह दिला जंगलात फेकून, तब्बल 10 वर्षानंतर घटनेचा झाला उलघडा

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 334 नवीन रुग्ण, 212 रुग्णांना डिस्चार्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ICICI Bank kotak mahindra bank customers can transfer 1 lakh rupees daily through upi mobile number only

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update