छोट्या व्यापार्‍यांसाठी खुशखबर ! ‘या’ बँकेने चालू केलेल्या खास सुविधेतून मिळणार १५ लाखाचं कर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीआयसीआय बँकेने छोट्या व्यावसायिकांसाठी आणि स्वतःचा उद्योग करणाऱ्या व्यक्तींसाठी एक खास ऍप लाँच केले आहे. या नवीन ऍपचे नाव ‘इंस्टाबिज’ (InstaBIZ) असून याद्वारे तुम्हाला बँकेच्या ११५ प्रोडक्ट्स आणि सुविधांविषयी माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एमएसएमई म्हणून ओवरड्राफ्ट फॅसिलिटी देखील मिळणार आहे. तर चला जाणून घेऊयात कशा प्रकारे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता

एकाच ठिकाणी मिळणार ११५ वस्तू आणि सुविधांची माहिती

आयसीआयसीआय बँकेने या ऍपविषयी माहिती देताना सांगितले कि इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल ऍपच्या रूपात हे सर्वात सुरक्षित आहे. त्याचबरोबर एकाच जागी ११५ वस्तू आणि सुविधांची माहिती मिळणार असल्याने ते बँकेत न जाता देखील आपले व्यवहार करू शकतात. एमएसएमई च्या मदतीने आपला व्यवसाय वाढवू देखील शकतात. त्याचबरोबर त्यांची विक्री देखील वाढू शकते. त्याचबरोबर या छोट्या व्यावसायिकांना ओवरड्राफ्ट फॅसिलिटी च्या स्वरूपात थेट १५ लाख रुपये मिळणार आहेत.

जीएसटीचे इन्स्टंट पेमेंट

बाकी सुविधांबरोबरच व्यावसायिकांना बिजनेस लोन, डिजिटल मोड्सद्वारे फंड कलेक्शन, पेमेंट, ऑटोमॅटिक बँक रिकॉन्सिलेशन तसेच मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट-इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन मोड यांसारख्या सुविधा देखील मिळणार आहेत. त्याचबरोबर या ऍपद्वारे तुम्ही सिंगल क्लिक पेमेंटच्या चलन नंबर वापरून थेट जीएसटीचे इन्स्टंट पेमेंट करू शकता.

आयसीआयसीआय बँकेत खाते नसेल तरी वापरू शकता

जर तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे खाते नसेल तरी देखील तुम्ही हे ऍप वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट आणि केवाईसी डिटेल्स अपलोड करून सरळ १० लाख रुपयाच्या ओवरड्राफ्ट फॅसिलिटीचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर ते करंट अकाउंटसाठी देखील अर्ज करू शकतात.

केसगळती होतेय का ? ‘हे’ ६ साधे-सोपे घरगुती उपाय करा

आंब्यातील कोय फेकू नका, उपयोगात आणल्यास करेल औषधाचे काम

‘सुपारी’ खाऊन ‘या’ ४ आजारावर करा कंट्रोल, जाणून घ्या

आरोग्यासंदर्भातील ‘या’ महत्वाच्या ११ प्रश्‍नांची उत्‍तरे आवश्य जाणून घ्या !

सावधान !  लहान मुलं सतत मोबाईल घेत असतील तर ‘हे’ नक्की वाचा

‘या’ ४ घरगुती उपायांनी करा कुरळे ‘केस’ सरळ

Loading...
You might also like