आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या एमडी चंदा कोचर यांचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज दिल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट आले. चंदा कोचर यांनी आपला कार्यकाळ संपण्या आगोदरच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5440deb8-c7b7-11e8-b03e-eb3c12657f94′]
व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज दिल्यानंतर चंदा कोचर गोत्यात सापडल्या होत्या. आयसीआयसीआयने याप्रकरणी कडक भूमिका घेत चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर आयसीआयसीआयने प्रुडेंशनल लाइफ इन्शूरेंसचे सीईओ असलेल्या संदीप बक्षी यांची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली. चंदा कोचरच्या गैरहजेरीत संदीप बक्षी हे आयसीआयसीआयचा सर्व कारभार पहात होते. व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज दिल्याच्या बदल्यात चंदा कोचर यांना आर्थिक लाभ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सीबीआयने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दीपक कोचर यांच्या कंपनीत व्हिडिओकॉन ग्रुपने आर्थिक गुंतवणूक केल्यामुळे चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज दिले असा त्यांच्यावर आरोप आहे.
[amazon_link asins=’B01M7ZS2HH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6eb5547b-c7b7-11e8-92f8-b9f1c17120e7′]
कोचर यांच्या राजीनाम्यानंतर बक्षी यांची पाच वर्षांसाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या चंदा कोचर यांचा कार्यकाळ मार्च २०१९ रोजी संपुष्टात येणार होता मात्र त्या आगोदरच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. चंदा कोचर यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे.