तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संकटात सामान्य लोकांमध्ये भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्याची जागृतता वाढली आहे. हे लक्षात घेऊन आयसीआयसीआय प्रूडेंन्शियल लाइफ इन्श्युरन्सने डिजिटल पेमेंट अ‍ॅप फोनपे सोबत काही काळापूर्वी एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी सादर केली होती. या पॉलिसीद्वारे ग्राहक स्वस्त दरात इन्श्युरन्स सुविधा घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे यामध्ये वार्षिक प्रीमियमचा दर खुपच कमी रक्कमेपासून सुरू होतो.

25 लाख रुपयांपर्यंत घेऊ शकता टर्म इन्श्युरन्स
आसीआयसीआय प्रूडेंशियल आणि फोनपेच्या या टर्म इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये प्रीमियम रक्कम 149 रुपये वार्षिकपासून सुरू होते. या पॉलिसी अंतर्गत एक लाख रुपयांपासून 25 लाख रुपयांपर्यंत वीमा करू शकता. ही पॉलिसी घेण्यासाठी मेडिकल तपासणीची सुद्धा आवश्यकता नाही.

पॉलिसीसाठी एक लाख वार्षिक उत्पन्न आवश्यक
आयसीआयसीआय प्रूडेंशियलने सांगितले की, ही पॉलिसी घेण्यासाठी ग्राहकाचे वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपये असावे. 18 ते 65 वर्ष वयाचा कुणीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकतो. फोनपे अ‍ॅप्लिकेशनद्वारे ग्राहक आपली पॉलिसी रिन्यू करू शकतो.

फोनपे यूजर्स अशी खरेदी करू शकतात पॉलिसी
* अँड्रॉईड आणि आयओएस यूजर्सने आपल्या फोनपे अ‍ॅप्लिकेशनच्या माय मनी सेक्शनवर क्लिक करावे.
* यानंतर इन्श्युरन्सवर क्लिक करा.
* आता टर्म लाईफ इन्शुरन्स सिलेक्ट करा.
* यानंतर ती रक्कम निवडा ज्यासाठी तुम्हाला वीमा काढायचा आहे.
* वीमाकृत व्यक्ती आणि तिच्या नॉमिनीच्या डिटेल्स दिल्यानंतर पॉलिसीची खरेदी पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करावे लागेल.