‘त्या’ प्रकरणात चंदा कोचर यांना हजर राहण्याचे समन्स

मुंबई  : वृत्तसंस्था – आयसीआयसीआय – व्हिडीओकॉनप्रकरणी चंदा कोचर यांना ३ मे रोजी सक्तवसूली संचलनालयाचे (ईडी) अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांना देखील हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत.

व्हिडीओकॉन समुहाचे वेणूगोपाल धूत यांना आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर यांनी ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज बेकायदा दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इडीने गेल्या काही महिन्यांपुर्वी धूत आणि चंदा कोचर यांच्या घराची झडती घेतली होती. मागील महिन्यात त्यांच्या तपासाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आता ३ मे रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. तसेच त्यांचे पती आणि दीर यांना ३० मे रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत.