कुलभूषण जाधव प्रकरणी भारताचा मोठा विजय ; फाशीची स्थगिती कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवरील स्थगिती कायम ठेवली आहे. न्यायालयाने जाधव यांना काउन्सिलर ऍक्सेस देण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्तानने या निर्णयावर आक्षेप घेतला. पण न्यायालयाने हा आक्षेप फेटाळून लावला. कुलभूषण जाधव यांना दिलेल्या सर्व शिक्षेचा पुनर्विचार करावा. असा आदेश न्यायालयाने पाकिस्तानला दिला आहे. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद यूसुफ यांनी हा निकाल वाचून सांगितला. १५ – १ अशा मताने हा निकाल भारताच्या बाजूने लागला आहे. व्हिएन्ना करार आणि नैसर्गिक न्याय यांचे उल्लंघन झाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. कारण कुलभूषण जाधव यांची बाजू ऐकून न घेता त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे.

काय आहे हे प्रकरण?

कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील ‘रॉ’साठी काम करीत असल्याचा आरोप पाकिस्ताने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते.

काय झाली होती शिक्षा?

पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. मात्र, या शिक्षेवर हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती लावली. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल लागत नाही, तोपर्यंत त्यांना शिक्षा न देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला होता. कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवलेले आरोप रद्द ठरवून त्यांची शिक्षा रद्द करावी आणि तातडीने त्यांची सुटका करावी, अशी मागणी भारताने केली. कुलभूषण जाधव यांना पुरावे नसताना अटक करण्यात आल्याचे भारताने सांगितले.

हरीश साळवे यांनी मांडली होती बाजू

कुलभूषण जाधव यांना पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते. तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फाशीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे न्यायालयाने पाकला बजावले होते. सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी या प्रकरणात बाजू मांडली होती.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान