कोरोना व्हायरसची Fake अ‍ॅडव्हायजरी सोशल मीडियावर होतेय वायरल, ICMR नं सांगितलं ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआरने) ने गुरुवारी सांगितले की, कोविड -19 शी संबधित गाईडलाइन्सची एक लिस्ट आयसीएमआरच्या नावाने सोशल मीडियावर वायरल होत आहे, ज्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याची माहिती देण्यात आली आहे परंतु ती फेक असून आयसीएमआरने अशी कोणतीही लिस्ट जारी केलेली नाही. त्यांनी ट्विट करून सांगितले की, सोशल मीडियावर शेयर करण्यात येत असलेली लिस्ट फेक आहे.

वायरल होत असलेल्या या यादीत दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरसचे हे संकट लवकरच संपणार आहे. आयसीएमआरने फेक अ‍ॅडव्हायजरीला ट्विटमध्ये जोडून म्हटले आहे की, ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहे. आयसीएमआरने अशी कोणतीही गाईडलाईन किंवा अ‍ॅडव्हायजरी जारी केलेली नाही. हे फेक सर्क्युलेशन आहे.

खोट्या यादीत सल्ला दिला आहे की, दोन वर्षासाठी परदेश प्रवास स्थगित करा, एक वर्षापर्यंत बाहेरचे खाणे खाऊ नका, ज्या व्यक्तीला खोकला असेल त्याच्यापासून दूर रहा. किमान एक वर्ष कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि ‘डॉन ‘शूज आपल्या घरात आणा. इतके की बाहेर जाताना बेल्ट, आंगठी, घड्याळ वापरू नका असा सल्ला सुद्धा यामध्ये दिला आहे.