Coronavirus : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी ‘तैनात’ असलेले पोलीससुद्धा घेऊ शकतात HCQ : ICMR नं सांगितलं

नवी दिल्ली : सरकारने हायड्रोक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) चा वापर करण्याबाबत दुरूस्त केलेली अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कोविड-19 नसलेल्या रूग्णालयांमध्ये काम करणारे आणि लक्षणे नसलेले आरोग्य कर्मचारी, कन्टेन्मेंट झोनमध्ये देखरेख आणि कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासंबंधी कामात तैनात अर्धसैन्य दल व पोलीस कर्मचारी रोग प्रतिबंधक औषध म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) चे सेवन करू शकतात.

यापूर्वी जारी अ‍ॅडव्हायजरी मध्ये म्हटले आहे की, कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यात सहभागी व लक्षणे नसलेले सर्व आरोग्य कर्मचारी आणि संसर्गीत लोकांच्या घरात संपर्कात आलेले लोक संसर्ग रोखण्यासाठी या औषधाचा वापर करू शकतात. मात्र, आयसीएमआरद्वारे दुरूस्त केलेल्या अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, औषध घेणार्‍या व्यक्तीने हा विचार करू नये की, तो एकदम सुरक्षित झाला आहे.

मुलांना देऊ नेय एचसीक्यू

दुरूस्त अ‍ॅडव्हायजरीनुसार एनआयव्ही पुणेमध्ये एचसीक्यूवर करण्यात आलेल्या अभ्यासात आढळले आहे की, याच्यामुळे संसर्गाचा दर कमी होतो. हे औषध त्या लोकांना देऊ नये, जे दृष्टी कमी करणार्‍या रेटिना आजाराने ग्रस्त आहेत, एचसीक्यूबाबत अति संवेदनशीलता तसेच ज्यांना हृदयाची धडधड कमी-जास्त होण्याचा आजार आहे, 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तसेच गरोदर व स्तनदा मातांना हे औषध देऊ नये.

एचसीक्यूचा हृदयावर होऊ शकतो वाईट परिणाम

नव्या अ‍ॅडव्हायजरीनुसार एचसीक्यूचा हृदयावर वाईट परिणाम कधी-कधी दिसून येतो. अशावेळी हे औषध घेणे बंद केले पाहिजे. हे औषध घेतल्यानंतर डोळ्यांना काही त्रास होत असल्यास ते घेऊ नये. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखी खाली घेतले पाहिजे.

एचसीक्यूचे दुष्परिणाम

अभ्यासानुसार एचसीक्यूचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी 1323 आरोग्य कर्मचार्‍यांसह काही लोकांचा अभ्यास करण्यात आला, त्याच्या निष्कर्षानुसार 8.9 टक्क्यांमध्ये जीव घाबरणे, 7.3 टक्क्यांमध्ये पोटदुखी, 1.5 टक्क्यांमध्ये उलटी, 1.7 मध्ये हायपोग्लायसीमिया आणि 1.9 टक्क्यांमध्ये हृदयासंबंधी समस्या आढळून आल्या.