Coronavirus : ‘कोरोना’च्या लढाईत ज्या औषधाला जगानं नाकारला, त्याचाच भारत करणार वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग कोरोना विषाणूची लस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच दुसरीकडे कोरोना टाळण्यासाठी सध्या कोणते औषधे उपयुक्त ठरू शकते याचाही शोध बरेच देश करत आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ला एका संशोधनात आढळले आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेतल्यास कोविड-१९ चा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. हे संशोधन यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे कारण अलीकडेच एक संशोधन समोर आले होते, ज्यात म्हटले होते की या औषधाचा कोरोनाविरूद्ध कोणताही परिणाम होत नाही. उलट या औषधामुळे कोरोना रूग्णांमध्ये हृदय संबंधी धोका वाढतो.

तर भारत सरकारने कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) चा वापर आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएमआरने मलेरियाच्या उपचारात वापरले जाणारे क्लोरोक्विन आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या वापरासाठी नवीन सुधारित गाइडलाईन जारी केली आहे. यापूर्वी संशोधन संस्थेने नवी दिल्लीतील केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या तीन रुग्णालयांवर याची चाचणी केली आहे. तपासणीत दिसून आले की, ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना (कोविड-१९ केअरमध्ये कार्यरत असणारेही) एचसीक्यू प्रॉफिलॅक्सिस देण्यात आले होते, त्यांच्यात सार्स-सीओव्ही-२ च्या संक्रमणाची शक्यता फारच कमी होती.

तसेच दुसरे एक संशोधन जे भारतातील सर्वात मोठे रुग्णालय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या ३३४ हेल्थ वर्कर्सवर केले होते, त्यात असे दिसून आले की २४८ कर्मचारी ज्यांनी सरासरी सहा आठवडे हे औषध प्रतिबंधक म्हणून खाल्ले, त्यांच्यात संक्रमणाची शक्यता औषध घेतले नाही त्यांच्यापेक्षा खूपच कमी होती.

अभ्यासात मिळालेल्या माहितीनुसार, आता आयसीएमआरने या औषधाला सर्व एसिम्प्टोमॅटिक आरोग्य कर्मचार्‍यांवर वापरण्याचा सल्ला दिला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये काम करणारे सर्व्हिलन्स कामगार, निमलष्करी दले आणि पोलिस कर्मचारी यासारख्या एसिम्प्टोमॅटिक फ्रंटलाइन कामगारांना आता हे औषध घेण्यास सांगितले जाईल.

डोससंदर्भात हे आठ आठवडे वापरता येऊ शकते असे यापूर्वी गाइडलाईन मध्ये म्हटले होते. परंतु तज्ञांच्या मते, ते साप्ताहिक डोस म्हणूनही घेतले जाऊ शकते. मात्र डॉक्टरांच्या निरीक्षणाची आवश्यकता असेल आणि ईसीजी पॅरामीटर्सची देखील काळजी घ्यावी लागेल.

आयसीएमआरने पूर्वी सांगितले होते की, या औषधाच्या वापरामुळे पोटदुखी आणि मळमळ यासारखे काही साइड इफेक्ट होऊ शकतात. अनेकदा या औषधामुळे हृदयाचे ठोके असामान्य होण्याच्या तक्रारी देखील आल्या आहेत.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनने कोणताही फायदा नाही?
आरोग्य क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या जर्नल लेसेन्टचे म्हणणे आहे की, मलेरियाच्या उपचारात वापरले जाणारे औषध क्लोरोक्वीन आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोविड-१९ च्या रूग्णांच्या उपचारात फायदेशीर असल्याचे पुरावे नाहीत. त्यांनी ताज्या संशोधनाचा हवाला देत दावा केला आहे की, मर्कोलाईडशिवाय किंवा त्यासोबतच या दोन औषधांचा वापर केल्याने कोविड-१९ रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ होते. जर्नलमध्ये सांगितले गेले आहे की, ताजे संशोधन सुमारे १५ हजार कोविड-१९ रुग्णांवर करण्यात आले आहे.

ट्रम्प देखील घेत आहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते मलेरिया विरोधी औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेत आहेत. जरी अमेरिकन तज्ञ आणि नियामकांनी असे म्हटले आहे की, हे औषध कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी उपयुक्त नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like