ICMR Recruitment 2020 : आयसीएमआरमध्ये 141 पदांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने सायंटिस्ट बी च्या विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकुण पदांची संख्या 141 आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार आयसीएमआरच्या अधिकृत वेबसाईटवर icmr.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलॉईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑक्टोबर 2020 आहे.

उमेदवारांना सल्ला आहे की, अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना लक्षपूर्वक वाचावी, जी तुम्हाला वेबसाइटवर मिळेल. आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा इत्यादी माहिती येथे मिळेल. अर्जात कोणतीही त्रूटी असू नये.

असा करा अर्ज –

1 सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icmr.nic.in वर जा.
2 येथे मेन वेबसाइटवर गेल्यानंतर करियर अपॉर्च्युनिटी लिंकवर क्लिक करा.
3 येथे उपलब्ध अधिसूचनामध्ये दिशा निर्देश वाचा.
4 आता अर्ज भरा.
5 अर्ज डाऊनलोड करा.
6 भविष्यातील सुविधेसाठी याची प्रिंट काढून घ्या.

महत्वाच्या तारखा –

* ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख- 12 सप्टेंबर, 2020
* ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 2 ऑक्टोबर, 2020
* अ‍ॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख- 20 ऑक्टोबर, 2020
* कंम्पूटर अधारित परीक्षेची तारीख- 1 नोव्हेंबर, 2020

उमेदवारांची निवड कम्पूटर आधारित परीक्षेच्या माध्यमातून होईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांचा इंटरव्ह्यू होईल.